मान्सून महाराष्ट्रात येण्यास लागणार एवढा कालावधी

मान्सून केरळला येऊन धडकला असला तरी अजून महाराष्ट्रात पोहचायला 6 जून किंवा त्यानंतरचा दिवस उजाडणार आहे. सध्या पुढील 24 तासांत महाराष्ट्राच्या काही भागांत विशेषतः दक्षिण कोकण, दक्षिण – मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. तर याच ठिकाणी पूर्ण दिवस आकाश ढगाळलेले राहील आणि हवा कोरडी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तापमान सध्या आहे तसेच राहिल्याने उकाडा कायम राहणार असल्याचं हवामान विभागने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *