गोरखपूर ते यशवंतपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसला अपघात, महिला जखमी

गोरखपूर ते कर्नाटकातील यशवंतपूर येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसला मोठा अपघात होता होता वाचला. एक्स्प्रेसला एसी बोगीच्या चाकाचा भाग तुटल्याने अपघात झाला. मात्र, ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात नागपूरपासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली.  १५०१५ ही एक्स्प्रेस यशवंतपूरला जात होती. त्यावेळी ए-२ या डब्याच्या चाकाचे दोन तुकडे पडले. त्यामुळे मोठ्याने रुळावर आवाज झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *