केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या दुपारी ४ वाजता सीबीएसईच्या १० वी च्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
