चारित्र्याच्या संशयावरुन पतीनचं पत्नीला जिवंत जाळलं

आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळालेल्या शिक्षिकेला तिच्या पतीनं चारित्र्याच्या संशयावरून गाडीमध्येच जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. मीनाकुमारी शिवशंकर बनसोडे असं मृत शिक्षिकेचं नाव असून, पती शिवशंकर बनसोडे याला मुरुड पोलिसांनी अटक केलीय.

लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावातल्या जिल्हा परिषद शाळेत ३४ वर्षीय मीनाकुमारी शिवशंकर बनसोडे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

बुधवारी पहाटे हे दोघेही आपल्या गाडीतून निघाले. मात्र, लातूर-बार्शी महामार्गावर बोरगाव काळे इथे, शिवशंकर बनसोडे यानं गाडीतच मीनाकुमारी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळलं. यात मीनाकुमारी यांचा जागीच मृत्यू झाला, सोबत गाडीही जळून खाक झाली. मात्र, यात शिवशंकर बनसोडेला साधं खरचटलंही नाही, उलट हे प्रकरण म्हणजे निव्वळ अपघात असल्याचं भासवायचा त्यानं प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *