कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगाव इथल्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं, कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ६७ वर्षांचे रमेश शिंदे आणि ६२ वर्षांचे प्रभावती शिंदे अशी या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत.

खाजगी तसंच बँकेचे कर्ज काढून रमेश शिंदे यांनी शेतात ऊस लावला. मात्र, मांजरा नदीच्या कालव्याचे पाणी त्यांना शेतीला मिळत नसल्यानं, पाण्याअभावी त्यांचा ऊस वाळू लागला. त्यातच कर्जाचा डोंगर वाढू लागल्यानं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

 सध्या लातूरच्या शासकीय रुग्णलयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. रमेश शिंदे यांची दोन मुलं, पुणे आणि नांदेडमध्ये खासगी नोकरी करतात. वीज वितरण कार्यालयातून निवृत्त झालेल्या रमेश शिंदे तीन एकर शेतीत कशीबशी शेती करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *