झोपडपट्टीत मरण यातना भोगणारी भावंड जाणार इटलीत

अहमदनगरमध्ये झोपडपट्टीत मरण यातना भोगणाऱ्या कबीर आणि जनाई ही दोन लहान भावंडं आता इटलीत जाणार आहेत. वर्षभरापूर्वी ही दोन भावंडं आणि एक तान्हं मुल अहमदनगरच्या स्नेहांकूर संस्थेच्या स्वयंसेवकांना सापडली.  हे दोघे बहिण भाऊ दत्तक म्हणून इटलीतल्या शिक्षक उद्योजक कुटुंबात जात आहेत. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ही भावंडं दत्तक विधानाद्वारे इटलीतल्या कुटुंबात गेली. या भावंडांसाठी स्नेहांकुरने इटलीतल्या विनाअपत्य सिल्व्हिया मेई आणि दुरिओ म्यानिझो या जोडप्याची निवड केली. विशेष म्हणजे इटलीतल्या या दाम्पत्यानं या बहिण भावाला एकाच वेळी दत्तक घेतल्यानं, त्यांची ताटातूटही होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *