लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांचे प्रमाण देशात तुलनेने कमी – सर्वेक्षण

सेक्सबाबतच्या अनेक गोष्टी आपण सातत्याने ऐकत असतो. मात्र त्याबाबतचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले असून त्यातून अनेक निष्कर्ष कमोर आले आहे. हे सर्वेक्षण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने केले आहे. यामध्ये ९० टक्के भारतीयांनी वयाच्या ३० वर्षाच्या आधीच पहिला सेक्स केलेला असतो. पुरुषांनी वयाच्या २० ते २४ या वयोगटातच पहिला सेक्स केलेला असतो असे यात म्हटले आहे. तर मुलींमध्ये हे वय १५ ते १९ वर्षे असते. भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्नानंतर सेक्सला मान्यता आहे. मात्र भारतात आजही लहान वयातच मुलींचे लग्न केले जात असल्याने मुलींमध्ये पहिला सेक्स करण्याचे वय कमी आहे. त्याचप्रमाणे जे मुले आणि मुली जास्त शिक्षण घेतात त्यांच्यात सेक्स बराच उशीरा होतो. हे लोक शाळेनंतर दिर्घकाळ महाविद्यालयीन शिक्षणात घालवत असल्याने त्यांना पहिला सेक्स करण्यास उशीर होतो.

लग्नाआधी सेक्स करणाऱ्यांचे प्रमाण देशात तुलनेने कमी असल्याचे म्हटले आहे. १५ ते २४ या वयोगटातील केवळ ११ टक्के पुरुष आणि २ टक्के महिला लग्नाआधी सेक्स करतात. यामध्येही छत्तीसगडमध्ये लग्नाआधी सेक्स करण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच २१.१ टक्के तर मध्य प्रदेशमध्ये हे प्रमाण २०.७ टक्के आहे. या सर्वेक्षणासाठी जवळपास १ लाखांहून अधिक पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या. उत्तर भारतीय लोकांमध्ये दक्षिण भारतीयांपेक्षा सेक्स लाईफ चांगले असे यामध्ये नोंदविण्यात आले आहे. एकटे असणाऱ्या आणि तरीही सेक्स लाईफ चांगले असणाऱ्या पुरुषांमध्ये पंजाब, हरयाणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. तर एकट्या महिलांमध्ये सेक्स लाईफ चांगले असणारी राज्ये कर्नाटक आणि गुजरात ही आहेत. यामध्ये १२ टक्के पुरुष आपल्या अनौपचारीक ओळख असलेल्या महिलांबरोबर सेक्स करतात. तर ६ टक्के पुरुष सेक्स वर्करबरोबर सेक्स करतात अशी नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *