बोलणे बंद केल्याने भोसरीत प्रियसीवर वार

बोलणे बंद केल्याने अल्पवयीन प्रेयसीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. भोसरी येथे सोमवारी (१४ मे) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी प्रियकराला अटक केली आहे.

शाहरुख रफिक शेख (वय २२, रा. आदर्शनगर, काजळे पेट्रोल पंपाच्या मागे, मोशी) असे अटक केलेल्या आरोपी नाव आहे. याबाबत सतरा वर्षीय युवतीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख याने पीडित युवतीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन बलात्कार केला. त्यामुळे त्या युवतीने आरोपी शाहरुख याच्याशी बोलणे बंद केले होते. या कारणावरून चिडलेल्या आरोपी शाहरूखने सोमवारी रात्री पीडितेच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच, युवतीला घराबाहेर ओढत आणून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *