निवृत्ती वेतनासाठी आधारसक्ती नाही

केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या तिसाव्या बैठकीत केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. बँकेच्या बचत खात्यांशी आधार क्रमांकाची जोडणी केली नसल्याने निवृत्ती वेतन मिळण्यात अडचण येत असल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांनी केल्या होत्या. याबाबत या बैठकीत सिंग यांनी ही स्पष्टोक्ती केली. निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी आधारसक्ती लागू नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने कर्मचारी व निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना लागू केल्या असून किमान नऊ हजार रुपये निवृत्ती वेतन हा त्याचाच एक भाग आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *