सायन – पनवेल महामार्गावर धावत्या कारला आग

सायन – पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर बुधवारी रात्री होंडा सीआरव्ही या कारने अचानक पेट घेतला. या आगीत गाडी जळून खाक झाली. सुदैवानं गाडीतील सर्व प्रवासी खाली उतरल्यानं कोणालाही दुखापत झालेली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. यामुळे काही काळ  मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *