रेल्वे स्थानकांची नावे आजपासून मराठीत

मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडीचे अनारक्षित तिकीट किंवा लोकलच्या तिकिटांवर स्थानकांची नावे आता मराठीत छापली जाणार आहेत. आज, मंगळवारपासून (एक मे)या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या आधी तिकिटावर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांत स्थानकांची नावे छापली जात होती. स्थानिक भाषांना प्राधान्य देण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्यानुसार देशभरातील त्या-त्या राज्यातील स्थानिक भाषेला प्राधान्य देण्यात येत आहे. रेल्वे तिकिटांवर स्थानकांची नावे स्थानिक भाषेतही छापण्यात येत आहेत. या धोरणानुसारच मध्य रेल्वेने अनारक्षित तिकिटांवर स्थानकांची नावे मराठी भाषेतही छापण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *