SC,ST: उमेदवारांच्या छातीवर लिहिले ‘SC’, ‘ST’

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आरोग्य तपासणीदरम्यान पोलीस हवालदार पदासाठी निवड करण्यात आलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांच्या छातीवरच त्यांचा वर्ग, अर्थात ‘एससी’, ‘एसटी’ असे लिहिण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.

धार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आरक्षित जागांसाठी भरतीचे अभियान चालवले गेले. याच दरम्यान निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या ओळखीसाठी जिल्हा रुग्णालयाने मात्र एक वेगळीच पद्धत अवलंबली. तपासणीदरम्यान आरक्षित वर्गाच्या उमेदवारांच्या थेट छातीवरच त्यांचा वर्ग नमूद करण्यात आला.

असा प्रकार घडल्याचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी मान्य केले. या प्रकाराबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या वेळी उमेदवारांची आरोग्य तपासणी होत असताना काही चूका झाल्या. अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी रुग्णालयाने असे केले का हे तपासण्यात येत आहे. मात्र, रुग्णालयाने असे नेमके कशासाठी केले याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असेही सिंह म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *