फॅशन डिझाइनर बापाने केला अल्पवयीन मुलींवर बलात्कार

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. एका 42 वर्षीय फॅशन डिझाइनर वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. फॅशन डिझायनर असून त्याने १७ आणि १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलींनी आईला हा प्रकार सांगताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पण हा प्रकार धक्कादायक आहे.

कुठे घडला हा प्रकार 

मुंबईत राहणाऱ्या ४२ वर्षांच्या फॅशन डिझायनरला चार मुलं आहेत. त्यातील 3 मुली या अनुक्रमे 17,13 आणि 10 वर्षाच्या 3 मुली आहेत. 17 वर्षाच्या मुलीने दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी तिच्या आईला बरे नसल्याने ती तिच्या खोलीत झोपली होती. याच दरम्यान नराधम पित्याने मोठ्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास शिक्षणासाठी पैसे देणार नाही आणि घरीच बसावे लागेल, अशी धमकी तो द्यायचा. तसेच आईला वेश्या व्यवसायात ढकलू, लहान भावाची हत्या करु, अशा धमक्या तो पीडितेला द्यायचा. यामुळे घाबरुन तिने हा प्रकार आईला सांगितला नाही. यानंतरही नराधमाने पीडितेवर अत्याचार सुरुच ठेवले.

बापानेच केला हा प्रकार 

गेल्या वर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये नराधमाने त्याच्या आणखी एका मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. मोठी मुलगी आणि दुसरी मुलगी या दोघी खोलीत टीव्ही बघत होत्या. यादरम्यान विकृत पित्याने त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि दुसऱ्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. मोठ्या मुलीने त्याला रोखण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यानंतर त्याने मोठ्या मुलीवरही बलात्कार केला. दोन दिवसांपूर्वी पित्याचे अत्याचार असह्य झाल्याने अखेर मोठ्या मुलीने धाडस दाखवत आईला वडिलांनी केलेल्या अत्याचारी माहिती दिली. तिने पतीला जाब विचारला. मात्र, त्याने पत्नीलाच मारहाण केली. अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोमवारी नराधम पित्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *