वागळे परिसरात वाहने जाळली

ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबिकानगर परिसरात पार्क करून ठेवण्यात आलेली चार वाहने जळाल्याचा प्रकार सोमवारी घडला. तीन अॅक्टिव्हा आणि एक बाइक या आगीत भस्मसात झाली असून या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गाड्यांच्या मालकांचे रविवारी दुसऱ्या गटातील तरुणांशी वाद झाला होता. या वादातून हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पुढील तपास करून याविषयी भाष्य करता येऊ शकेल. पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती वागळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र मालेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *