सलमानच्या सुटकेसाठी कतरिना सिद्धीविनायकचरणी!

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला तुरुंगाची हवा खावी लागणार की नाही याचा फैसला आज होणार आहे. नेमका हाच दिवस सुरु होता होता, म्हणजे रात्री १२ वाजता सलमानची मैत्रीण कतरिना कैफ सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली. तिच्यासोबत सलमानची बहीण अर्पिताही होती. त्यामुळे सलमानच्या सुटकेचं साकडं घालण्यासाठीच या दोघी बाप्पाकडे आल्या असल्याचं बोललं जात आहे.

राजस्थानमधील जोधपूर कोर्टात आज काळवीट प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. सलमानसोबतच अभिनेता सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम या अभिनेत्रींवरही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता सलमान खान जोधपूरला आला होता. त्यावेळी काळवीटाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्या जीप्सीमध्ये अभिनेत्री निलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खानही होता. शिकार करण्यासाठी सलमानला भरीस घातल्याचा या कलाकारांवर आरोप ठेवण्यात आला आहे. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री हे या प्रकरणावर निर्णय देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *