गर्भवतीला ८०० फूट खोल दरीत फेकलं, सुदैवाने पोटातल्या बाळासह सुरक्षित

माथेरानमधून एक आश्चर्यकारक बातमी. आठशे फूट खोल दरीत फेकून दिलेली महिला सुखरुप आहे. विवाहबाह्य संबंधांतून एका गर्भवती महिलेला पेब किल्ल्यावरच्या कड्यावरचा गणपती या ठिकाणाहून आठशे फूट खोल दरीत फेकून देण्यात आलं. पण ती मध्येच एका कड्यावर अडकल्यानं ती सुखरूप राहिली. तिला सह्याद्री मित्र रेस्क्यू टीम आणि स्थानिकांनी सुखरुप बाहेर काढलंय. तिला थोडी दुखापत झालीय. तिच्यावर कर्जतमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलंय.विशेष म्हणजे तिच्या पोटातलं बाळही सुरक्षित आहे. यानिमित्तानं देव तारी त्याला कोण मारी, हा प्रत्यय पुन्हा आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *