केदारनाथमध्ये भारतीय हवाई दलाच्या M17 हेलिकॉप्टरचा अपघात

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना झाल्याचं वृत्त आहे. भारतीय हवाई दलाच्या एम-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारजणांना किरकोळ दुखापत झाली असून ते सर्व सुखरूप आहेत. पण हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हेलिपॅडवर उतरत असताना लोखंडी गर्डरसह टक्कर झाल्याने हा अपघात झाला त्यानंतर हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूला आग लागली होती. गुप्तकाशी येथून केदारनाथला हेलिकॉप्टर जात होतं. भारतीय हवाई दलाच्या या हेलिकॉप्टरमध्ये बांधकामाचं साहित्य होतं. केदारनाथमध्ये हे साहित्य पोहोचवत असताना हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *