एसी लोकलच्या डब्यात एसीतून गळती

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलमधील एका डब्यात गळती झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रवाशांनी ट्वीट करून प्रशासनास ही बाब लक्षात आणून दिली आहे. दरम्यान, ही दुरुस्ती तातडीने करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एसी लोकलमधील एका डब्यातून गळती होत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी त्याचे चित्रण करून ते सोशल मीडियावर टाकले. ही गळती एसीशी जोडलेल्या नलिकेतून होत असून त्यावर लवकरच उपाय शोधला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पश्चिम रेल्वेवर एकमेव एसी लोकल धावत असल्याने त्यातील अंतर्गत दुरुस्तीत अडचणी येतात. ही सेवा शनिवार, रविवारी बंद असल्याने तेव्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *