बोगस पोलीस अधिकाऱ्याला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलीस अधिकारी असल्याच सांगत अनेक जणांना फसवणा-या अमित अम्बिका सिंग याला नाशिक पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वी यूपीएससीची परीक्षा दिलीय. मात्र परीक्षेत नापास झाल्याने त्याने गृहखात्याचं बोगस कागदपत्र तयार करून अनेकांना आपण पोलीस अधिकारी असल्याच सांगत फसवत होता.

आरोपीने ओलाची गाडी भाड्याने घेतली होती. या गाडीत तो नाशिक शिर्डी आणि इतर ठिकाणी फिरत होता. गाडी चालकाने पैसे मागितले असता आपण पोलीस अधिकारी असल्याचं सांगत पिस्तूल दाखवलं.

त्यामुळे गाडीचालकाला शंका आल्यानं त्याने सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या अगोदरही आरोपीने अनेकांचे पैसे बुडविले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *