डॉक्टर पेशातील व्यावसायिक स्पर्धा कोणत्या थराला?

डॉक्टर पेशातील व्यावसायिक स्पर्धा कोणत्या थराला गेली आहे, याचा धक्कादायक अनुभव पुण्यातील नामांकित डॉक्टर जयश्री तोडकर यांना आला आहे. लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयश्री तोडकर यांच्याकडे चक्क २० लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईतल्या पाच डॉक्टरांनीच ही खंडणी मागितल्याचा आरोप डॉ. तोडकर यांनी केला आहे. याप्रकरणी पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ओबेसिटीच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या वादातून प्रदीप चौबे, राजेश खुल्लर, अतुल पीटर, मुजफ्फर लकडावाला आणि श्रीहरी ढोरे पाटील यांनी इमेल द्वारे तोडकर यांना धमकावलं. ही बदनामी थांबवायची असल्यास आपल्याला २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केल्याचं तोडकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *