चौथ्या मजल्यावरुन उडी मारत पोलीस हवालदाराची आत्महत्या

विरारमध्ये पोलीस हवालदाराने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

विरार पश्चिम डोंगरपाडा येथील चोरघे आळीतील अमोघ दर्शन या इमारतीत काल सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली आहे. किशोर आत्माराम दळवी असं आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात मोटार परिवहन शाखा तांत्रिक विभागात पेंटर म्हणून ते कार्यरत होते.

मागच्या सहा महिन्यांपासून दळवी यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी त्याची पत्नी त्यांना टेरेसवर फिरवत असताना अचानक पत्नीचा हाताला झटका मारून त्यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *