तामिळनाडूप्रमाणे आता कर्नाटकात 10 रुपयात मिळणार जेवणाची थाळी

– तामिळनाडूतील ‘अम्मा कॅन्टीन’ योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये ‘इंदिरा कॅन्टीन’ योजना सुरु होत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज बंगळुरुमध्ये येत असून त्यांच्या हस्ते इंदिरा कॅन्टीनचे उदघाटन होणार आहे. या कॅन्टीनमध्ये सकाळचा नाष्टा 5 रुपयात तर, दुपार आणि रात्रीचे जेवण 10 रुपयात उपलब्ध होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी बजेट सादर करताना अशा प्रकारची कॅन्टीन सुरु करण्याची घोषणा केली होती.

कर्नाटकाचे वित्तखाते सिध्दरामय्या यांच्याकडेच असून, त्यांनी बजेट वाचनामध्ये नम्मा कॅन्टीन असा उल्लेख केला होता. पण काँग्रेसच्या आमदारांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर ‘इंदिरा कॅन्टीन’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले. अम्मा कॅन्टीन योजना तामिळनाडूत प्रचंड लोकप्रिय ठरली. जयललिता यांच्या अण्णाद्रमुकला सलग दुस-यांदा सत्तेत पोहचवण्यात ही योजनी महत्वपूर्ण ठरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *