सुभाष देसाईंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला होता. यानंतर विरोधकांनी देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाईं यांनी राजीनामा   दिला आहे.

सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. मात्र मुख्यमंत्र्यांनी देसाई यांचा राजीनामा फेटाळलाय. एमआयडीसीची ४०० एकर जमीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मूळ मालकाला परत केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *