देशाचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज (शुक्रवारी) शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. व्यंकय्या नायडू हे आता मावळते उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांची जागा घेतील. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व केंद्र सरकारमधील मंत्री आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
नायडू यांनी हिंदीमध्ये उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात येण्यापूर्वी त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधी तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नायडू यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता.
