मराठा मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

मराठा मोर्चाला अर्धा तास उरला असताना प्रचंड गर्दी वाढत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून अनेक लोक मुंबईत दाखल झालेत. तर कर्नाटकातूनही अनेक जण आलेत. दरम्यान, या मराठा  क्रांती मोर्चाला शिवसेनेने आपला पाठिंबा जाहीर केलाय.

दरम्यान, शिवसेनेबरोबरच मराठा क्रांती मोर्चाला आता ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे. या दिवशी काम बंद आंदोलन पुकारून डबेवाले या मोर्चात सहभागी होणार आहेत.

भायकळा येथून हा मोर्चा आझाद मैदान इथे पोहोचल्यानंतर सरकारशी समिती चर्चा करणार  आहे. मराठा मोर्चाची २४ सदस्यांची समिती सरकारसोबत मागण्यांसंदर्भात चर्चा करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *