चंद्रपुरात पोलिसांची सायकल गस्त

दिवसा आणि रात्री गस्ती दरम्यान पोलीस गल्ली बोळात गस्त घालत नाही असा आरोप नेहमीच पोलीस विभागावर स्थानिकांकडून केला जात असतो.

यावर तोडगा काढण्यासाठी तसेच पोलिसांना शारिरिकरित्या सक्षम ठेवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांनी पोलिसांची सायकल गस्त ही नवी संकल्पना आखली आहे.

या संकल्पनेची चाचपणी करण्याकरीता शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दोन सायकल देण्यात आल्यात. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील इतरही पोलीस स्टेशन्स मध्ये पोलिसांना सायकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *