आंबोलीत सेल्फीमुळे नाही तर नशेत दोघांचा मृत्यू, व्हीडिओ व्हायरल

जिल्ह्यातील आंबोलीत दोन पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली असून सेल्फी  काढण्याच्या नादात नाही, तर दारुच्या नशेत पाय घसरल्यामुळे दोघांचा मृत्यू  झाल्याचं आता समोर येत आहे.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावं होती. हे दोघेही तरूण दारु प्यायल्यानंतर डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते. हे नसतं साहस दोघांच्या जीवावर बेतलं.

डोंगराच्या कडेला असलेला संरक्षक कठडा ओलांडल्यानंतर व्हीडिओ काढणाऱ्या लोकांनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नशेत असल्यामुळे दोघांनाही काही समजत नव्हते.  त्याचवेळी एकाचा पाय घसरला आणि त्याच्यासोबतच दुसराही घरंगळत दरीत कोसळला. यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *