कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

कुकरचा स्फोट  होऊन एका वडापाव विक्रेत्याचा मृत्यू   झाल्याची धक्कादायक घटना रविवारी नाशिकच्या जेलरोड परिसरात घडली आहे. जेलरोडच्या सैलानी बाबा चौकात भवानी वडापाववाले म्हणून प्रसिद्ध असलेले अशोक पाटील जवळ असलेल्या अयोध्यानगरमध्ये राहत होते.

नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन काम करत असताना मोठ्या कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी टाकले होते. यावेळी शिट्टी का होत नाही हे बघत असताना अचानक कुकरचा स्फोट झाला आणि झाकण उडाले.

उडालेल्या झाकणामुळे पोट, छाती, हात आणि चेह-याला गंभीर जखम झाली. मोठ्या आवाजामुळे आसपासचे नागरिक घराबाहेर गोळा झाले. पाटील यांच्या पोटातून मोठा रक्तस्त्राव सुरू असल्याने कुटुंबियांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *