तालुक्यातील अभय अरण्यातील वनखंड क्र . 109 मधील सुकळी-सामरी पाडा येथे राहत असलेला चंद्र्िरसंग चमा:या पावरा याच्या झोपडीत 15 हजार रुपये किमतीची गावठी बंदूक आढळून आली. ही बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पो. नि. डी.के. परदेशी व फौजदार मनोहर मोरे यांच्या नेतृत्वाखाली युनूस तडवी, यमन सुरळकर, संजीव चौधरी, महम्मद तडवी, हरिदास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
