पुढील १५ दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होणार

सध्या बाजारात किलोला शंभरी गाठलेले टोमॅटोचे दर पुढील १५ दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे.

टोमॅटोची आवक वाढणाऱ असल्याने दर कमी होणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलीये.

सध्या बाजारात टोमॅटोचे दर प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचलेत. आवक घटल्याने त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरांवर झालाय. २९ जूनला कोलकातामध्ये टोमॅटोचे दर ९५ रुपये प्रति किलो आहेत तर दिल्लीत ९२ रुपये किलो, मुंबईत ८० रुपये किलो टोमॅटो तर चेन्नईत ५५ रुपये किलोंनी टोमॅटोची विक्री केली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *