ठाणे, जळगावात ‘इंदू सरकार’ रिलीजविरोधात काँग्रेसची आंदोलनं

इंदू सरकारच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसनं आंदोलनं केलीयत.  ठाण्यातल्या कोरम मॉलमधला सकाळी 9 चा शो बंद पाडण्यात आलाय.

या प्रकरणी काँग्रेसच्या 10 ते 15 कार्य़कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  तर कल्याणमधल्या मेट्रो मॉलमधल्या आयनॉक्स थेटरमधलाही सकाळी साडे दहाचा शो बंद पाडलाय.

तर जळगावमध्ये आयनॉक्स आणि नटवर सिनेमागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. इंदू सरकारचे सकाळी साडे नऊचे शो बंद केले. तिकीट विंडोजवळच्या साहित्याचीही नासधूस करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *