अभिनेता इंदर कुमार यांचं निधन

बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार  यांचं निधन झालंय. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वॉन्टेड, तुमको ना भूल पायेंगे, मासूम, घुंगट यासारख्या सिनेमांमध्ये इंदर यांनी अभिनय केला होता. तसेच स्टार प्लसवरील प्रसिध्द शो ‘क्योकी सांस भी कभी बहु थी’ या मालिकेत मिहीर ही लोकप्रिय व्यक्तिरेखा इंदर यांनी काही काळ साकारली होती…

अंधेरीस्थित त्यांच्या घरात आज सकाळी इंदर बेशुद्धावस्थेत सापडले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इंदर कुमार यांचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झाला असल्याची शक्यता वर्तवली जातेय. ते सध्या एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *