जग समजण्याअगोदरच चिमुरड्यानं मिटले डोळे!

घाटकोपरच्या सिद्धीसाई अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून १७ मृतदेह बाहेर आलेत. त्यामध्ये अवघ्या १३ महिन्याच्या क्रिशव डोंगरेचाही समावेश आहे. जग काय असतं हे समजण्याआधीच त्यानं डोळे मिटलेत…

आजी आजोबांच्या मांडीत निवांत विसावलेल्या क्रीशवचा फोटो आता फोटच उरलाय. क्रिशव डोंगरे आज या जगात नाही. एक वर्षाचा क्रीशव मंगळवारी सकाळी आपल्या घरात खेळत होता. त्याचे आईवडील नुकतेच त्याला खाऊ घालून कामावर गेले होते… आणि नेमका काळानं घाला घातला…

घाटकोपरची इमारत कोसळण्यापू्र्वी अगदी गुण्या गोविंदानं नांदणाऱ्या डोंगरे कुटुंबातले तीन सदस्य आज जगात नाहीत. सारं कुटुंबच हादरून गेलंय.

सिद्धी साई इमारतीतल्या रहिवाशांच्या कहाण्या ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. साईसिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांवरचं संकट दुहेरी आहे. एकीकडे आपली माणसं गमावली आहेत… आणि दुसरीकडे आयुष्यभ कमावलेलं सारचं मातीमोल झालंय. त्यामुळे इमारत कोसळताना रहिवाशांवर डोळ्यासमोर दुःखाचा डोंगर उभा करून गेलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *