कोपऱ्याच्या दुखापतीमुळे जोकोविच संपूर्ण सिझनसाठी बाहेर

कोपऱ्याच्या दुखापतीमुळे  12 वेळचा ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचला टेनिसच्या संपूर्ण सिझनला मुकावं लागणार आहे. यामुळेच आता जोकोविच्या टेनिसची जादू त्याच्या चाहत्यांना अमेरिकन ओपनमध्येही पाहता येणार नाही.

विम्बल्डनच्या क्वार्टर फायनलमध्ये थॉ़मस बर्डिचविरुद्धची मॅच त्याला दुखापतीमुळे अर्धवट सोडावी लागली होती आणि आता अखेर त्यानं संपूर्ण सिझन न खेळण्याचा निर्णय घेतलाय.

गेल्या सिझनमध्ये फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर त्याला ग्रँडस्लॅम जिंकता आलेलं नाही. या सिझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या राऊंडमध्ये आणि फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *