‘सैनिक कल्याणासाठी एक टक्का टॅक्स लावा’

सैनिक कल्याणासाठी सर्व नागरिकांना एक टक्का टॅक्स  लावण्यात यावा अशी मागणी  अक्षय कुमारने केलीय. कारगिल विजय दिवसानिमित्त राज्य सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात अक्षय कुमारने ही मागणी केलीय. स्वच्छता कर म्हणून ज्याप्रकारे टॅक्स घेण्यात येतो तशाच प्रकारे सैनिकांसाठीही असा टॅक्स घेण्यात यावा, असं वक्तव्य अक्षय कुमारनं केलं आहे.

सैनिक कल्याणासाठी सरकारच्या योजनांची अक्षयने स्तुती केली. तसंच खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांसाठी ५ टक्के आरक्षण असावं अशी इच्छा राज्याचे कॅबिनेटमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *