घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली

घाटकोपर येथील दामोदर पार्क येथे चार मजल्याची  इमारत कोसळली   आहे. घाटकोपरमधील साई अपार्टमेंटमधील ही इमारत कोसळली आहे. ही रहिवाशी इमारत होती आणि रहिवासी या इमारतीत राहत होते. त्यामुळे काही जण या इमारतीखाली दाबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. ४० वर्ष जुनी ही इमारत असल्याची माहिती आहे. पडलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर नर्सिंग होम आहे. यामध्ये गरोदर महिला आणि लहान जन्मलेली बाळ असण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *