कसा-याच्या उंटदरी घाटात कार कोसळून मुलीचा मृत्यू

कसा-याच्या उंटदरी घाटात कार कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू  झालाय. तर ४ जणांना वाचवण्यात यश आलंय.

नाशिकहून मुंबईच्या दिशेने ही कार येत होती. यावेळी ही दुर्घटना घडली. घंटादेवी मंदिराच्या समोर ही कार उभी होती.

यावेळी रिव्हर्स घेत असताना गाडीचा वेग वाढला आणि गाडी दरीत कोसळली. एकूण पाच जण या कारमध्ये होते. या दुर्घटनेत चौघे प्रवासी वाचले असले तरी मुलीचा मात्र मृत्यू झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *