आरे परिसरात लैंगिक अत्याचार झालेल्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू

आरे परिसरात लैंगिक अत्याचार झाल्यानंतर विष प्राशन केलेल्या 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी साडे चार वाजता केईम हॉस्पिटलमध्ये या मुलाचा मृत्यू झाला आहे. गेले पंधरा दिवस या मुलाची केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू होती. पीडित मुलाच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे. आरेमधील मोरारजी नगरमध्ये दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या दोघांपैकी एका मुलाचा याआधी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्याचा मंगळवारी मृत्यू झाला. या घटनेला पंधरा दिवल उलटले तरीही आरोपींचा शोध लागला नसून त्यांचा तपास अजूनही केला जातो आहे. यामुळे पवई परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.तसंत पोलिसांनी तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

आरेमधील मोरारजी नगरमध्ये आसिफ (नाव बदलले आहे) आणि सुनील (नाव बदलले आहे) ही दोन्ही पीडित मुलं राहत होती. यातील एक मुलगा दहा वर्षांचा तर दुसरा तेरा वर्षांचा होता. 12 जुलै रोजी या मुलांनी उंदीर मारायचं विष प्राशन केलं. ही बाब त्यांच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र, यात आसिफचा मृत्यू झाला. तर, सुनीलला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे तो चार दिवस होता. मात्र, त्याचं लिव्हर निकामी झाल्यामुळे त्याला तातडीने परळच्या केईम रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. पण मंगळवारी सकाळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. माझ्यावर आणि माझ्या मित्रासोबत सुद्धा अत्याचार झाला आहे आणि याच लाजेमुळे आम्ही दोघांनीही विष प्यायलो आहे, असं या मुलाने सांगितलं होतं. हा धक्कादायक प्रकार आरे परिसरात घडला असून याप्रकरणी पवई पोलीस चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *