धक्कादायक! धावत्या गाडीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

दिल्ली, हरयाणा ही राज्ये महिलांसाठी अजूनही सुरक्षित नसून, बलात्कार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही इथे महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी झालेले नाहीत. दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण ताजी करुन देणारी एक घटना समोर आली आहे. हरयाणातील गुरगाव येथून महिलेचे अपहरण करुन धावत्या गाडीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारानंतर आरोपींनी पीडित महिलेला ग्रेटर नोएडाजवळ गाडीतून बाहेर फेकून दिले. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
पीडित महिला राजस्थान भारतपूर येथे राहणारी असून, ती सोहना येथे आपल्या एका नातेवाईकाकडे आली होती.  पीडित महिलेला गाडीबाहेर फेकले तेव्हा ती बेशुद्धा अवस्थेत होती. रस्त्यावरुन जाणा-या एका महिला वाटसरुला पीडित महिला रस्त्यावर पडलेली दिसली तिने लगेच पोलिसांना माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *