तोतया रेल्वे टीसीला मुंबईत अटक

रेल्वे तिकीट चेकर आहे  असे सांगून प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या बोगस तिकीट चेकरला अंधेरीच्या रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आलीये.

रवींद्र नेटबाजी असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी रवींद्र आपण तिकीट चेकर असल्याचे सांगत विनातिकीट प्रवाशांकडून ५०० ते १००० रुपये दंड मागत असे.

पोलिसांना यांची माहिती मिळताच अंधेरी रेल्वे स्थानकात पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *