देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार

देवदर्शनासाठी नारायणपूरला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.  नारायणपूर येथे एका महिलेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  उरुळी कांचन-जेजुरी मार्गावर शिंदवणे  घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
पीडित महिला केडगाव परिसरातील राहणारी आहे. ती नारायणपूरला देवदर्शनासाठी गेली होती. घरी येण्यासाठी रात्री उशीर झाल्यानं पारगाव चौफुला येथे ती उभी होती. यावेळी फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला व नंतर घाटामध्ये सोडून दिलं. पीडित महिलेनं घाटातून प्रवास करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांच्या मदतीनं फॉर्चुनर गाडीचा नंबर मिळविला आणि लोणी-काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *