सिरीअलमध्ये भूमिकेच्या आश्वासनाने अल्पवयीन तरुणीवर गँगरेप

अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगलेल्या अल्पवयीन तरुणीची दिशाभूल करुन तिच्यावर गँगरेप करण्यात आला. मुंबईजवळच्या मिरा रोडमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

अमेय राकेश भावसार आणि शुभम लालबिहारी पाठक या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोघांनी त्यांचा मित्र राकेश सोबत एका सतरा वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पीडित तरुणी आणि आणि आरोपी शुभम, अमेय हे एकाच परिसरात राहतात. पीडितेला टीव्ही सीरिअलमध्ये काम करण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे दोघांनी राकेशची ओळख सीरिअलचा निर्माता अशी करुन दिली. दोघांनी तिच्याबरोबर मैत्री वाढवली आणि टीव्ही मालिकेत काम देण्याचं आश्वासन दिलं.

9 जूनला तिघांनी तिला गोराई भागात भेटण्यासाठी बोलावलं. तिथे एका हॉटेलमध्ये तिला सिगरेट आणि दारु पाजली. त्यानंतर नशेच्या अवस्थेत तिला मिरा रोड येथील एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडितेने मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघांना गजाआड करण्यात यश मिळवलं आहे. तर राकेशचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *