ओटीपी नंबर घेऊन डॉक्टरला 50 हजाराचा गंडा

बँक व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करून तीन वेळेस ओ़टी़पी नंबर घेऊन येथील डॉक्टराच्या खात्यातून परस्पर 49 हजार 996 रूपये काढून फसवूणक केल्याची घटना उघडकीस आली आहे.  चौथ्या वेळेस नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमणध्वनीवर शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आह़े  याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

शहरातील जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्वार्टर नं़ 3 मध्ये राहणारे डॉ़ शिवेंद्रकुमार  सिंघल (वय 61) यांना मंगळवारी सायंकाळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका फोन आला़ मी बँकेचा व्यवस्थापक बोलत आहे, अशी बतावणी केली़ त्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेल्या ओ़टी़पी नंबर तीन वेळा घेऊन त्यांच्या जॉईंट बँक खात्यातून 49 हजार 996 रूपये काढून फसवणूक केली़

त्यानंतर पुन्हा सिंघल यांच्याकडून चौथ्या वेळेस ओ़टी़पी क्रमांकाची मागणी केली़ तेव्हा नंबर दिला नाही म्हणून त्यांना भ्रमध्वणीवरून शिवीगाळ करून धमकी दिली़ हा प्रकार मंगळवारी सायंकाळी 5.57 ते 6.57 या एक तासातच घडला़ याबाबत डॉ़ शिवेंद्रकुमार सिंघल यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि कलम 420, 507 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *