पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू

पुण्यातील खडकी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अशोक डूबल आणि मारिया रॉक असे या कामगारांची नावे आहेत. या दुर्घटनेत अन्य दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्फोट हा अपघात घडला. स्फोटक वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सकाळी कामगार काम करत असताना साडे नऊच्या सुमारास दोन स्फोटक वस्तू हाताळताना ही घटना घडली. ही वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असताना हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यात दोन जणाचा जागीच मृत्यू झाला तसेच दोन जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात आधिक तपास  पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *