अंधश्रद्धेपोटी भोंदूबाबाकडून चक्क शेण खाऊ घातले

लातूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आलीये. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा  मोठ्या प्रमाणात जोपासली जात आहे…

लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील धनगरवाडी येथील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला भानामती झाल्याच्या अंधश्रद्धेपोटी भोंदूबाबा कडून चक्क शेण खाऊ घालण्याचा किळसवाणा प्रकार पुढे आला आहे.  हा प्रकार कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील कवठा येथील भोंदूबाबाने केला आहे….

लातूर जिल्ह्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेण खाऊ घालत असतानाचा एक्सकलुसिव्ह व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला आहे. विशेषबाब म्हणजे हा सर्व प्रकार अंधश्रद्धेला बळी पडलेल्या या अल्पवयीन मुलीच्या वडीलांपुढे घडला आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्यात  तिच्या वडीलांसाहित ०५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जादूटोणा विरोधी कायदा कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *