लंडनच्या पश्चिम भागात असणाऱ्या २७ मजली ग्रेनफेल टॉवरला काही वेळापूर्वी भीषण आग लागलीय.
अग्निशमन दलाचे तब्बल ४० बंब आणि २०० कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
इमारतीत १२० कुटुंब अडकल्याची भीती व्यक्त होतेय. स्थानिक वेळेनुसार रात्री १ वाजून १६ मिनिटांनी ही आग लागल्याचं पुढे येतंय.
