अभिनेत्री कृतिका चौधरीचा संशयास्पद मृत्यू

मॉडेल आणि अभिनेत्री कृतिका चौधरीचा मुंबईतील राहत्या घरी मृतदेह आढळला. कृतिकाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून ‘परिचय’ या मालिकेत आणि ‘रज्जो’ या सिनेमामध्ये तिने काम केले होते.

सोमवारी संध्याकाळी अंधेरीत राहत्या घरी कृतिकाचा मृतदेह आढळला. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारी राहणाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर घरात तिचा मृतदेह आढळला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून तीन ते चार दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृतिकाची हत्या झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मात्र या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. शवविच्छेदनानंतरच कृतिकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

कृतिका ही मूळची उत्तराखंडच्या हरिद्वारची होती. यशस्वी मॉडेल आणि अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते आणि यासाठीच ती मुंबईत आली होती. कृतिका ही मूळची उत्तराखंडच्या हरिद्वारची रज्जो या चित्रपटात तिने काम केले होते. याशिवाय २०११ मध्ये बालाजी टेलिफिल्मच्या परिचय या मालिकेत तिने काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *