वाईमध्ये भाजप नगराध्यक्षांसह पतीला अटक

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्ष लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या आहेत.

ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना भाजपच्या नगराध्यक्षांना अटक करण्यात आलीय. वाईच्या नगराध्यक्ष डॉ प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती सुधीर शिंदे याना १४ हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलंय.

ठेकेदाराला शौचालय बांधणीचा उर्वरित ८ लाखाचा चेक देण्यासाठी १४ हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *