चारित्र्याच्या संशयावरुन सुनेची हत्या करून सास-याची आत्महत्या

चारित्र्याच्या संशयावरून सास-यानं सुनेच्या डोक्यात लोखंडी सळईने जोरदार प्रहार करुन निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे सुनेची हत्या केल्यानंतर सासऱ्यानं स्वतः आत्महत्या केली आहे.  पाथरी तालुक्यातील नाथरा येथे गुरुवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पाथरी तालुक्यातील नाथरा येथील दामोदर रामभाऊ डुकरे (वय 70 वर्ष) यांचा मुलगा अंतराम डुकरे यांचा माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथील सौमित्रा यांच्यासोबत  2011 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन वर्षाची एक मुलगी आहे.

गुरुवारी मध्यरात्री सौमित्रा ही झोपेत असताना 12.30 वाजण्याच्या  सुमारास सासऱ्याने लोखंडी पाहरीने सौमित्राच्या डोक्यात जोराचा वार केला. सपासप वार झाल्याने अंगणात झोपलेल्या सौमित्राचा पती अंतराम यांना जाग आली.
ते तातडीने घरात गेले असता सौमित्रा रक्ताच्या थारोळ्यात  पडल्याचे दिसले. मुलाने वडिलांना आवरण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे शेजारील मंडळीही जागी झाली व त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा  आरोपी सासरा शेताकडे पळून गेला.
या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी पाथरी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोहन माचरे, सह पोलीस निरीक्षक रामोड आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सासऱ्याचा शोध घेतला असता त्यांना शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *