छोटा शकीलच्या शार्प शूटरला दिल्ली पोलिसांकडून अटक

गँगस्टर छोटा शकीलचा शार्प शूटर जुनैद चौधरीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत अटक केली आहे. छोटा शकीलच्या या हस्तकाला दिल्लीतच अटक करण्यात आली. पुर्व दिल्लीजवळी गगन थिएटरजवळ गुरुवारी रात्री पोलिसांनी जुनैद चौधरीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनैदकडून एक गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे.
 जुनैदला गतवर्षी 3 जून रोजीदेखील इतर तिघांसोबत अटक करण्यात आली होती. त्यावेळी जुनैद चौधरी हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी यांच्या हत्येचा कट रचत होता. याप्रकरणी जुनैदला तीन ते चार महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं. यानंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आली होती. जुनैद इंटरनेट चॅटशिवाय इतर माध्यमातून माफिया डॉन छोटा शकीलशी संपर्क साधायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *